Tiranga Times Maharastra —
अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांच्या जुळ्या मुलांबाबत एक मोठा खुलासा समोर आला आहे. लव आणि कुश यांना रामानंद सागर यांच्या गाजलेल्या ‘रामायण’ मालिकेत लव-कुशच्या भूमिकेसाठी सुरुवातीला विचारात घेण्यात आले होते, मात्र काही कारणांमुळे ही संधी त्यांच्या वाट्याला आली नाही. शत्रुघ्न सिन्हा यांच्या पावलावर पाऊल ठेवत मुलगी सोनाक्षी सिन्हाने चित्रपटसृष्टीत यशस्वी कारकीर्द घडवली, तर तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही ती सातत्याने चर्चेत राहिली आहे. भावांच्या अनुपस्थितीपासून ते कुटुंबातील नातेसंबंधांपर्यंत अनेक बाबींबाबत विविध चर्चा रंगल्या असल्या तरी सिन्हा कुटुंबाने यावर फारसे भाष्य केलेले नाही.
